
सातारा : अवकाळीच्या नुकसान भरपाईचे वाटप जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. साधारण १५ कोटींचे वाटप केले जात आहे. यामध्ये पडलेली घरे, पशुधन, दुकानदार, टपरीचालकांच्या नुकसानीसह शेतीच्या नुकसानीचा समावेश आहे. शेतीच्या नुकसानीची भरपाई ही नवीन दराप्रमाणे करण्याची सूचना शासनाने केल्याने शेतकऱ्यांना वाढीव भरपाई मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची व सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्ते, पूल, साकवांची मिळून ७९० कोटींची नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडून मंजुरीला पाठविला आहे. या विभागांना अद्याप भरपाईची रक्कम मिळालेली नाही.