
-सुनील शेडगे
नागठाणे: हाडाचा शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. शिक्षणाशी असलेली त्याची नाळही तुटत नाही. याचीच प्रचिती देताना एका प्राथमिक शिक्षिकेने वयाच्या चक्क ८० व्या वर्षी विद्यार्थ्यांचा तास घेतला. इतकेच काय, यावेळी इंटरॅक्टिव्ह बोर्डचाही सहजतेने वापर केला.