esakal | 831 नागरिकांना डिस्चार्ज; 831 जणांचे नमुने तपासणीला
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 831 नागरिकांना घरी सोडण्यात आले.

831 नागरिकांना डिस्चार्ज; 831 जणांचे नमुने तपासणीला

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 831 नागरिकांना घरी सोडण्यात आले. याबरोबरच 831 जणांचे नमुने तपासणीसाठी शुक्रवारी (ता. 25) पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण 48, कोरेगाव 75, वाई 71, खंडाळा 44, रायगांव 116, पानमळेवाडी 132, मायणी 43, महाबळेश्वर 60, दहिवडी 43, खावली 19, तळमावले 27 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 113 असे एकूण 831 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top