esakal | गुड न्यूज! 'कराड जनता'च्या ठेवीदारांचे 329 कोटी जमा; 39 हजार ठेवीदारांना होणार 'लाभ'

बोलून बातमी शोधा

Karad Janata

गुड न्यूज! 'कराड जनता'च्या ठेवीदारांचे 329 कोटी जमा; 39 हजार ठेवीदारांना होणार 'लाभ'

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : दिवाळखोरीतील कराड जनता सहकारी बॅंकेच्या केवायसी केलेल्या पाच लाखांच्या आतील 42 हजार ठेवीदारांपैकी 39 हजार 32 ठेवीदारांचे 329 कोटी 76 लाख 311 रुपये बॅंकेच्या खात्यात जमा झाले आहेत. येत्या 15 दिवसांत तांत्रिक पूर्तता करून त्या पैशांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अवसायानिक तथा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली. पाच लाखांच्या आतील 42 हजार ठेवीदारांच्या तब्बल 400 कोटींचे प्रस्ताव श्री. माळी यांनी रिझर्व बॅंकेकडे दाखल केले होते. त्यातील 90 टक्के ठेवीदारांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ठेवीदारांत आनंदाचे वातावरण आहे.

कराड जनता बॅंकेत पाच लाखांच्या आतील दीड लाख ठेवीदार आहेत. त्यातील 42 हजार ठेवीदारांनी अवसायानिक श्री. माळी यांनी केलेल्या आवाहनानुसार, कागदपत्रांची पूर्तता केली. श्री. माळी यांनी त्याचे प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे मागील महिन्यात दाखल केले होते. त्यातील नव्वद टक्के ठेवीदारांची रक्कम परत मिळणार आहे. कराड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकिंग परवाना रिझर्व्ह बॅंकेने डिसेंबर 2020 मध्ये रद्द केला. बॅंकेवर उपनिबंधक माळी यांची अवसायानिक म्हणून नियुक्ती आहे. पाच लाखांच्या आतील ठेवींना शासनाच्या विम्याचे संरक्षण होते. त्यामुळे त्या ठेवीदारांचे पैसे परत देण्याबाबत अवसायानिक माळी यांनी ठेवीदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा Oxygen Tanker पळवण्याचा डाव फसला; साताऱ्याचे 'सिंह'च ठरले जांबाज

त्यानुसार पाच लाखांच्या आतील 42 हजार ठेवीदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली. त्यांचे 399 कोटींचे प्रस्ताव श्री. माळी यांनी तयार करून रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवले होते. श्री. माळी यांनी दाखल केलेल्या प्रस्तावातील पहिल्या टप्प्यातील 329 कोटी 76 लाख 311 रुपयांची रक्कम मंजूर होऊन त्याचे पैसे बॅंकेच्या खात्यातही जमा झाले आहेत. काही तांत्रिक गोष्टी पूर्ण केल्यानंतर 15 दिवसांत ते पैसे वाटप करणार आहे, असे माळी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ""मंजूर 329 कोटी 76 लाख 311 रुपये बॅंकेच्या खात्यात जमा आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून 39 हजार 32 ठेवीदारांची यादी आलेली नाही. ती प्राप्त होताच शाखानिहाय विभागणी करून ठेवीदारांना बोलावून पैसे दिले जाणार आहेत.''

उत्पादन शुल्कच्या धडक कारवाईत 5 लाखांची दारू जप्त; 26 गुन्ह्यांत 28 जणांना अटक

कराड जनताच्या ठेवीदारांची स्थिती

  • पाच लाखांच्या आतील ठेवीदारांची संख्या - दीड लाख

  • पाच लाखांच्या आतील ठेवीदारांची रक्कम - 429 कोटी 43 लाख 67

  • पाच लाखांच्या आतील पैसे मिळण्यासाठी पाठवलेले प्रस्ताव - 42 हजार

  • पाच लाखांच्या आतील पैसे मंजूर प्रस्ताव - 39 हजार 32

  • मंजूर ठेवीदारांना मिळणारी रक्कम - 329 कोटी 76 लाख 311

Edited By : Balkrishna Madhale