
सातारा : माजी मंत्री (कै.) अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त कर्तव्य सोशल ग्रुप, सायन हॉस्पिटल, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दीड महिना ते १५ वर्षांपर्यंतच्या ९६ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला होता.