केंजळगडावर ट्रेकिंग करताना दरीत कोसळून दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

Kenjalgad
Kenjalgadesakal

वाई (सातारा) : तालुक्याच्या पश्चिम भागातील केंजळगडावर (Kenjalgad) चढाई करत असताना दहा वर्षाचा मुलगा खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झाला. त्यास पाखेरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याला वाई येथील प्राथमिक उपचारानंतर (First Aid) पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. (A 10 Year Old Boy Was Seriously Injured When He Fell Into A Ravine While Trekking On Kenjalgad In Wai Satara Marathi News)

Summary

केंजळगडावर पर्वतारोहण करण्यासाठी सासवड (ता. पुरंदर) परिसरातील रहिवासी असलेले सात ते आठ पर्यटक आले होते.

केंजळगडावर पर्वतारोहण (Mountaineering) करण्यासाठी सासवड (ता. पुरंदर) परिसरातील रहिवासी असलेले सात ते आठ पर्यटक आले होते. यामध्ये मयांक गणेश उरणे (Mayank Urane) हा आपल्या वडिलांसोबत आला होता. आज सकाळी सात वाजता गडावर पर्वतारोहण करण्यासाठी सुरुवात केली. सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान पुढे जात असताना या चमूतील मयंक उरणे (वय १०) हा दोनशे फूट खोल खड्यात कोसळून गंभीर जखमी झाला. थंड हवा, पावसाची (Rain) रिपरिप, वाढलेले गवत यामुळे किल्ल्याच्या (Forts) पाऊल वाटेवर चिपचीप झाली आहे. यामुळे मयांकचा पाय घसरून तो दोनशे फूट दरीत कोसळून झाडाला धडकून झुडपात अडकला होता. त्याचा शोध करुनही तो सापडत नसल्याने संबंधित पर्यटकांनी आसरे ते रायरेश्वर रस्त्यावर असणाऱ्या पाखिरे वस्तीवर येऊन ग्रामस्थांना माहिती दिली.

Kenjalgad
सावधान! महाबळेश्वरात कडक पोलिस बंदोबस्त; पर्यटकांना बंदी

त्यानंतर वस्तीतील गंगाराम सपकाळ, सागर पाकिरे, सुरेश पाकिरे, रामदास पाकिरे, सचिन पाकिरे, नवनाथ पाकिरे, विलास पाकिरे, विजय पाकिरे आदी तरुण व ग्रामस्थांना सोबत घेऊन सर्वजण मयंक उरणे याचा शोध घेण्यास गेले. त्यावेळी तो खोल दरीत गंभीर जखमी अवस्थेत आढळला. बाहेर काढून त्याला वाई येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आले. येथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. ही माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय मोतेकर, पोलिस नाईक शिवाजी वायदंडे, सुभाष धुळे प्रशांत शिंदे, अमित गोळे, संजय देशमुख, संतोष शेलार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाखिरे वस्तीतील युवकांनी मुलाचा शोध घेऊन बाहेर काढल्याबद्दल व मदत कार्य केल्याबद्दल वाई तालुक्यातील नागरिकांनी वस्तीतील ग्रामस्थांचे आभार मानले.

A 10 Year Old Boy Was Seriously Injured When He Fell Into A Ravine While Trekking On Kenjalgad In Wai Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com