

Shivendrasinhraje Bhosale inspecting the conference venue and reviewing preparations with officials.
sakal
सातारा: जिल्ह्याला ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. साताऱ्याच्या नावलौकिकाला साजेसे असे शतकपूर्व संमेलन यशस्वी होईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. संमेलनादरम्यान साहित्यरसिकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनास त्यांनी सूचना केल्या.