esakal | गोंदीसह आटकेमध्ये नदीकाठी मगरीचे दर्शन! नागरिकांत भीतीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

गोंदीसह आटकेमध्ये नदीकाठी मगरीचे दर्शन! नागरिकांत भीतीचे वातावरण

नदीकाठच्या गावांमधील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोंदीसह आटकेमध्ये नदीकाठी मगरीचे दर्शन! नागरिकांत भीतीचे वातावरण

sakal_logo
By
- अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (सातारा): गोंदी व आटके- जाधव मळीनजीकच्या कृष्णा नदी पात्रातील खडकावर क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे दुशेरे, आटके, कोडोली, कार्वे, शेरे, गोंदी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, खुबी, तसेच मालखेड या नदीकाठच्या गावांमधील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: सातारा : लाच प्रकरणी वरकुटे-म्हसवडचा तलाठी जाळ्यात

अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला आलेला पूर ओसरल्यानंतर कृष्णा काठावरील दुशेरे, आटके, मालखेड, कोडोली कार्वे या गावांमध्ये मगरीचे दर्शन झाले. कृष्णा नदीकाठावर एका बाजूस आटके, तर दुसऱ्या बाजूस गोंदी ही गावे वसलेली आहेत. सोमवारी (ता. ३०) तेथील युवक क्रिकेट खेळण्यासाठी नदीकाठावर गेले असताना त्यांना नदीपात्रातील खडकावर मगर दिसली. त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

loading image
go to top