नारायणवाडी दुमदुमली! निवृत्त जवानाची गावानेच काढली वाजतगाजत मिरवणूक

नारायणवाडी दुमदुमली! निवृत्त जवानाची गावानेच काढली वाजतगाजत मिरवणूक
Summary

देशसेवेनंतर आपल्या गावी परतलेल्या जवानाच्या जंगी स्वागताने जवानाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

काले (सातारा): फुलांनी सजवलेली बैलगाडी, जीप, घोडे, घरासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, औक्षण, फुलांचा वर्षाव, ढोल ताशांचा गजर अन भारत माता की जय च्या निनादात अशा आगळ्या वेगळ्या वातावरणाने नारायणवाडी दुमदुमली. त्याला निमित्त होते, गावचे सुपूत्र अन् भारतीय लष्कारातील जवान प्रवीण यादव यांची निवृत्ती. देशसेवेनंतर आपल्या गावी परतलेल्या जवानाच्या जंगी स्वागताने जवानाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

नारायणवाडी दुमदुमली! निवृत्त जवानाची गावानेच काढली वाजतगाजत मिरवणूक
ऑलिम्पियन प्रवीण जाधवचं कुटुंब सातारा जिल्हा सोडणार

नारायणवाडी येथील जवान प्रवीण मोहन यादव 17 वर्षे देश सेवा पूर्ण करून गावी परतले. त्यावेळी त्यांचे सपत्नीक अविस्मरणीय स्वागत झाले. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले श्री. यादव यांना लहानपणापासून सैन्याचे वेड होते. मेहनतीसह जिद्दीने ते २००४ मध्ये आर्मी मध्ये भरती झाले. त्यांचा देश सेवेचा प्रवास सुरू झाला. पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू काश्मिर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशसहीत सियाचीनला देश सेवा केली. मृत्यूच्या दाढेतून परत आलो तो क्षण आजही आठवला तरी अंगावर शहारे येतात. पण त्या प्रसंगांना सामोरे जात भारत मातेचे रक्षण करणे हेच अंतिम होते. अशा शब्दात जवान यादव यांनी सेवेतील अनुभव सांगितले. १७ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ते कार्यरत होते. सेवा पूर्ण आलेल्या यादव यांचे गावी जोरदार स्वागत झाले. भैरवनाथ गणेश मंडळाने मिरवणूक काढली.

नारायणवाडी दुमदुमली! निवृत्त जवानाची गावानेच काढली वाजतगाजत मिरवणूक
'प्रवीणच्या कुटुंबीयांना सातारा सोडण्याची वेळ येवू देणार नाही'

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजर फटाक्यांची आतषबाजी अन् फुलांचा वर्षावात मिरवणूक झाली. सुवासिनींनी त्यांना औक्षण केले. ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, गावातील सार्वजनिक मंडळांतर्फे यादव यांचा सपत्नीक सत्कार झाला. यावेळी सेवा निवृत्त मुख्याध्यापक मुकुंद पन्हाळे, तानाजी देशमुख, दिलीप यादव, रंगराव यादव, जालिंदर यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच शकुंतला नलवडे, सोसायटीचे अध्यक्ष महादेव यादव, उपसरपंच रणजित देशमुख, प्रदीप पाटील, सुनील देशमुख, पंडितराव पाटील, दीपक देशमुख उपस्थित होते. कृष्णात यादव यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com