esakal | चिखली फाट्यावर भीषण अपघात; रक्तबंबाळ महिलेला 'माई'मुळे जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात

चिखली फाट्यावर भीषण अपघात; रक्तबंबाळ महिलेला 'माई'मुळे जीवदान

sakal_logo
By
गजानन गिरी

मसूर (सातारा) : किवळ (ता. कऱ्हाड) येथील माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा संगीता साळुंखे यांच्यामुळे आज चिखलीनजीक अपघातात गंभीर जखमी महिलेला जीवदान मिळाले. रुग्णालयात वेळीच उपचारासाठी दाखल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

हेही वाचा: कोरोनाचे निर्बंध पाळत गणेशोत्सव साजरा करा; पोलिसांचं मंडळांना आवाहन

मसूर-किवळ रस्त्यावर चिखली फाट्यावर मालवाहतुकीचा डंपर व दुचाकीत अपघात झाला. मसूरकडे दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्यातील संगिता पवार ह्या महिला गंभीर जखमी झाल्या. खड्ड्यात पडल्याने दोन्ही पायास मोठी इजा झाल्याने त्या रक्तबंबाळ अवस्थेत पडल्या होत्या. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. संगीता साळुंखे या कार्यक्रमासाठी साताऱ्याला निघाल्या होत्या. रस्त्यावरची गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली. अपघात झाल्याचे त्यांना लक्षात आले.

अपघातात जखमी झालेल्या महिलेला आपल्या गाडीत घालून कऱ्हाडला रुग्णालयात नेत असतानाच सह्याद्री कारखान्यानजीक अगोदरच मोबाईलवरून संपर्क साधलेली रुग्णवाहिका येताना त्यांना दिसली. तत्काळ रुग्णवाहिकेला हात दाखवून त्यांनी थांबण्याचा इशारा केला.

त्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी महिलेला कऱ्हाडला कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तातडीने उपचारही सुरू झाले. रुग्णालयातील डॉक्टर व व्यवस्थापनाशी चर्चा करून जखमी महिलेसह तिच्या पतीला धीर देत त्या परत मार्गस्थ झाल्या. संगीता साळुंखे यांच्यामुळे संगीता पवार यांना वेळीच मदत व उपचार मिळाल्याने तिला जीवदान मिळाले.

loading image
go to top