esakal | कोरोनाचे निर्बंध पाळत गणेशोत्सव साजरा करा; पोलिसांचं मंडळांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Ganaraya

जावळी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथे आयोजित केली होती.

कोरोनाचे निर्बंध पाळत गणेशोत्सव साजरा करा; पोलिसांचं मंडळांना आवाहन

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

मेढा (सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव कोरोनाचे निर्बंध पाळत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे- खराडे यांनी केले. जावळी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथे आयोजित केली होती. त्यात शीतल जानवे- खराडे बोलत होत्या. तहसीलदार राजेंद्र पोळ, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, मेढ्याचे नगरसेवक शशिकांत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: सातारा : इच्छुकांत धाकधूक अन्‌ धास्तीही

पोलिस उपअधीक्षक जानवे- खराडे म्हणाल्या, ‘‘सणांचे महत्त्व प्रशासनाला समजू शकते. सणांना निर्बंध घालून प्रशासनाला आनंद होत नाही. मात्र, कोरोना महामारीने सध्या संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कोरोनाने सर्वांना हतबल केले आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही व कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. यावर्षी नवीन सार्वजनिक मंडळांसाठी परवानगी दिली जाणार नाही. जुन्या मंडळांनी परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करायचा आहे.’’ त्यांनी गणेशोत्सव साजरा करताना पाळावयाचे नियम सांगून रक्तदान, मास्क वाटप आदी सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: नेत्यांच्या सभांना गर्दी चालते, सणांच्या वेळी का नाही?- राज ठाकरे

राजेंद्र पोळ म्हणाले, ‘‘तालुक्यातील नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर तालुक्यात कोरोनाचा फैलाव अधिक झाला होता, तसेच आता कोरोनाची तिसरी लाट येणाची शक्यता देखील आहे. त्यामुळे यावर्षी सर्वांनी नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करावा.’’ या वेळी माने, गुरव यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी उल्लेखनीय कार्याबद्दल पोलिस पाटलांचा सन्मान करण्यात आला. पोलिस पाटील सुहास भोसले यांनी आभार मानले.

loading image
go to top