esakal | कास पठारला नेदरलँडच्या पर्यटकांची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

कास पठारला नेदरलँडच्या पर्यटकांची भेट

कास पठारला नेदरलँडच्या पर्यटकांची भेट

sakal_logo
By
सुर्यकांत पवार

कास : पुष्प पठार कास वर फुलांचा रंगोत्सव सुरू झाला आहे. राज्यभरातील, तसेच विदेशातील पर्यटक ही कासला भेट देत आहेत. पर्यटकांची गरज लक्षात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने फिरते एटीएम सेंटर कास पठारावर सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ऐनवेळच्या पैशाची गरज भागवली जाणार आहे. दरम्यान, पठारावर नेदरलँड्सच्या पर्यटकांनी भेट दिली.

हेही वाचा: वैभववाडी: करूळ घाटात रस्त्यावर दगड कोसळला

कास पठारावर येणारे पर्यटक पुणे, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात. परिसरातील वजराई-एकीव धबधबा, बामणोली, सह्याद्रीनगर पवनचक्क्या प्रकल्प आदी ठिकाणी पर्यटक जातात. अशा वेळी जास्त पैसे जवळ ठेवणे जिकिरीचे ठरते. हल्ली अनेक जन ऑनलाइन बॅंकिंगचा वापर करत असले, तरी रेंजअभावी ऑनलाइन व्यवहार करणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या या सेवेमुळे पर्यटकांना रोकड सहज उपलब्ध होत आहे.

शनिवार, रविवार व इतर दिवशी ही फिरती व्हॅन पठारावर हजेरी लावत असते. दरम्यान, कासला नेदरलँड्सच्या पर्यटकांनी भेट देऊन कासवरील निसर्गाची प्रशंसा केली. वी व्हिजिट एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी कास प्लाटू ऑन कोल्ड, विंडी, रेनी डे. दॅट वॉज कम्पस्टेड बाय द वॉर्म, कास ईज अ ब्युटीफूल प्लेस, ऑल स्टाफ दॅट हेल्पड अस, अॅप्रिसिएट धीस अॅण्ड एक्सप्लेन द ब्यूटी ऑफ कास, अशी प्रतिक्रिया आर्थर डुरवेल यांनी कास समितीच्या व्हिजिट बुकमध्ये केली.

loading image
go to top