वैभववाडी: करूळ घाटात रस्त्यावर दगड कोसळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडी: करूळ घाटात रस्त्यावर दगड कोसळला

वैभववाडी: करूळ घाटात रस्त्यावर दगड कोसळला

वैभववाडी: घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटरस्त्यावर आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोठा दगड कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. पोलीसांनी जेसीबीच्या सहाय्याने दगड हटविल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.

हेही वाचा: कसबा तारळे: दरडीच्या मुरूमाची विक्री होत असल्याचा शेतकऱ्यांना संशय

तालुक्यात गेले दोन मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरक्षः झोडपुन काढले. घाट परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. आज सकाळपासुन देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. घाट परिसरात सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे करूळ घाटात रस्त्यावर मोठा दगड कोसळला. या दगडाने रस्त्याचा निम्मा भाग व्यापला. कोसळलेल्या दगडामुळे तळेरे-गगनबावडा मार्गावरील वाहतुक काहीशी विस्कळीत झाली.

जेथे दगड कोसळला होता तेथुन एकेरी वाहतुक सुरू होती. दगड कोसळल्याची माहीती वैभववाडी पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस हवालदार मारूती साखरे आदी घटनास्थळी पोहोचले. दगड मोठा असल्यामुळे पोलीसांनी जेसीबी पाचारण केले. तासाभरानंतर जेसीबी घाटात पोहोचले. त्यानंतर घाटरस्त्यावर कोसळलेला दगड हटविण्यात आला. दीड तासानंतर घाटमार्गावरील वाहतुक पुर्ववत झाली.

Web Title: Vaibhavwadi A Stone Fell On The Road In Karul Ghat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SangliSatara