esakal | भूस्खलनमध्ये जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू! 17 वा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेचा मृत्यु

भूस्खलनामध्ये मृत झालेल्या बाधिताची संख्या 17 झाली आहे.

भूस्खलनमध्ये जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू! 17 वा बळी

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा): येथे 22 व 23 जुलैला कोयना विभागात झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसाने कोयना विभागात अनेक ठिकाणी भूस्खलन होवून विभागातील ढोकावळे या गावावर आपत्तीचा डोंगर कोसळला होता. या भूस्खलनामध्ये ढोकावळे या गावातील 4 ग्रामस्थ जमिनी मध्ये गाडली होती. तर जखमी झालेले उपचार घेवून परत निवारा गृहात आलेल्या एका जखमी महिलेचे उपचार सुरु आसताना निवारा गृहात निधन झाले आहे. यामुळे भूस्खलनामध्ये मृत झालेल्या बाधिताची संख्या 17 झाली आहे.

हेही वाचा: पावसाळ्यातील पर्यटनाचे आगार कोयनानगर

मुसळधार पाऊसाचे माहेरघर असणाऱ्या कोयना विभागात 22 व 23 जुलैला झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसाने कोयना विभागाचे कंबरडे मोडले आहे. 24 तासात 746 मीमी पाऊस झाल्यामुळे कोयना विभागात अनेक ठिकाणी भूस्खलन होवून विभागात मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी होवून विभागावर आपत्तीचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा: कोयनानगर : शिवसागरच्या बोटिंगसाठी "मानाईनगर स्पॉट' निश्‍चित

कोयना विभागातील मिरगाव येथील 11 तर ढोकावळे येथील 4 तर हुंबरळी येथील 1 असे 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ढोकावळे येथील जखमी असणाऱ्या वैशाली विठ्ठल वाडेकर (60) रा. ढोकावळे यांच्यावर सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरु होते. ढोकावळे गावाला चाफेर-मिरगाव हायस्कूल मध्ये स्थलांतरीत केल्यामुळे प्रकृतीत सुधारणा होत असल्याने पुढील उपचार त्यांना हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत देण्यात येत होते.

loading image
go to top