Satara Landslide : साताऱ्यात मृत्यूतांडव; भूस्खलनात 10 जणांचा बळी, 14 बेपत्ता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aambeghar Landslide

अतिवृष्टीमुळे पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झालेली आहे.

Satara Landslide : साताऱ्यात मृत्यूतांडव; भूस्खलनात 10 जणांचा बळी

सातारा : अतिवृष्टीमुळे पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातील (Heavy Rain In Satara) मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झालेली आहे. सद्य:स्थितीत मिरगांव येथील एकाचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाखाली गाडल्या गेलेल्या व्यक्तींची निश्चित संख्या सांगता येत नाही. या ठिकाणी एनडीआरएफचे (NDRF) एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यामार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आठ व्यक्तींचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत एनडीआरएफच्या जवानांनी 27 नागरिकांची सुटका केली आहे. (Aambeghar Satara Landslide 10 Death In Satara Aambeghar Morgiri Patan Landslides)

मुसळधार पावसाने तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी (Ambeghar Landslide) येथे पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या भूस्खलनात वाहून गेले. अवघ्या १० उंबऱ्याच्या गावात ​चार कुटुंबच गुराढोरासहित वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्या कुटुंबातील १४ जण बेपत्ता आहेत. भूस्खलनाच्या राडोरोड्यात ती गाडली गेली असावीत, अशी भीती व्यक्त होत आहे. एनडीआरएफचे पथकही मदतीस पोचू शकले नाही.

Ambeghar Landslide

Ambeghar Landslide

तहसीलदार योगेश टोम्पे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह स्थानिक प्रशसकीय अधिकाऱ्यांची पथकेही गावात पोचू शकली नाहीत. आंबेघरला येणाऱ्या दोन्ही मार्गावरील पूल पाण्याखाली गेले होते. दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाटण तालुक्यात हाहाकार माजला आहे. तालुक्‍यातील नऊ ते दहा ठिकाणी भूस्खलनाच्या घटना आहेत. कोयना, मोरणा व ढेबेवाडी विभागातही त्याची नोंद झाली आहे. बऱ्याच ठिकाणी वित्त हानी झाली असली तरी अद्याप त्याची आकडेवारी निश्चित आलेली नाही. मोरगिरीच्या डोंगर पायथ्याला आंबेघर तर्फ मरळी येथे दुर्घटना घडली. अवघ्या पंधरा उंबरा असलेले गाव म्हणजे खालचे आंबेघर. संपूर्ण गावच वाहून गेले आहे. गावातील १० पैकी सहा कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात स्थानिकांना पातळीवर लोकांना यश आले. पहाटे दोननंतर अंधारात झालेले गोंधळ उडाला. भूस्खलनात चार कुटुंब त्याच बेपत्ता आहेत. कोसळलेल्या डोंगर गावात संकट घेऊन आला. त्या डोंगराच्या राडारोडामध्ये आख्खं गाव गडप झालं. त्यामध्ये ही चार कुटुंब त्यांच्या गुराढोरासहीत गाडल्याची भीती तहसीलदार योगेश टोम्पे यांनी व्यक्त केली.

Satara Landslide

Satara Landslide

चार कुटुंबातील 14 सदस्य अद्याप बेपत्ताच!

गावांमध्ये मदत कार्य पोचलेली नाही आंबेघरमधील दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एनडीआरएफ टीम आंबेगाव येथे पाठवली, मात्र तत्पूर्वीच तहसीलदार टोम्पे, गटविकास अधिकारी साळुंखे त्यांचे पथक तेथे पोचले होते. आंबेघर यला लागून असलेला डोंगर पूर्ण कोसळून खाली आल्यामुळे गावाच्या अलीकडे तीन किलोमीटरवर राडारोडा पसरला होता. चिखलाचा खच साचला होता. त्यामुळे जेसीबीसह कोणतीच यंत्रणा कोणती तेथे पोहोचू शकली नाही. परिणामी, स्थानिक नागरिकांनी एकमेकाला मदत करत सहा कुटुंबांना जीवदान मिळाले. त्या कुटुंबातील सदस्य गोकुळ येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. चार कुटुंबातील किमान 14 सदस्य बेपत्ता आहेत. ती सारेच भूस्खलनाच्या राडारोडा खाली गेले असण्याची शक्यता आहे.

Morgiri-Patan

Morgiri-Patan

आंबेघरसह गोकुळ, मोरगिरीचा संपर्क तुटला

आंबेघर येथे जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग आहेत ते पूल पाण्याखाली गेल्याने गोकुळ पासून मोरगिरी व आंबेघरच्या दोन्ही वाड्यांचा संपर्क तुटला. गव्हाणवाडी कुसरुंड ते मोरगिरी पहिला मार्ग पावसामुळे बंद पडला होता. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन पुढे जात नव्हते. केवळ बोटे वाहनांसाठी रस्ता खुला होता. सांगवड बेलवडे माणगाव दुसरा मार्ग मोरगिरी पर्यंत जातो. त्याही पुलावरून पाणी गेल्यामुळे बंद होता. त्यामुळे आंबेघर सहित गोकुळ मोरगिरीचा संपर्क तुटला होता. मदत करण्यासाठी पोचलेली यंत्रणा गोकुळ मोरगिरी परिसरातच अडकून पडली होती. त्यात तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस यांचा समावेश होता आंबेघरचे चार कुटुंब शोधण्यासाठी व पुढील मदत कार्य राबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र त्यातही पावसाच्या अडचणी येत होत्या.

सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आसून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्त हानी झालेली आहे. सद्य:स्थितीत मिरगाव येथील एक मयत व्यक्ती आढळून आलेली आहे. तथापि, भूस्खलनाखाली व्यक्ती गाडल्या गेलेल्या असल्यामुळे निश्चित संख्या सांगता येत नाही. या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यामार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे.

Aambeghar

Aambeghar

ढिगाऱ्यात अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका

जावली तालुक्यातील रेंगडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता आहेत व दोन व्यक्ती मयत झालेल्या आहेत. तसेच वाई तालुक्यातील कोंढवळे येथे पाच घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेलेली असून सद्य:स्थितीत दोन व्यक्ती मयत आढळून आलेल्या आहेत. या ढिगाऱ्यात अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. जोर याठिकाणी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये 594.04 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा गावाचा संपर्क तुटला असून धावरी या ठिकाणी एक व्यक्तीचा मृत्यू झाला आह. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे व शेतीपिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक आज सायंकाळपर्यंत दाखल होणार असून यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तत्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार आहे.

Patan

Patan

काय घडलं रात्री? आंबेघरच्या नागरिकांनी सांगितला थरार

सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. आंबेघरमध्ये काल (22 जुलै) दिवसभर मुसळधार पाऊस पडला. रात्रीदेखील पाऊस सुरुच होता. आंबेघरचे गावकरी रात्री गाढ झोपेत होते. या गावकऱ्यांना पुढे काय होणार आहे याची पुसटशी कल्पनासुध्दा नव्हती. दरवर्षीप्रमाणे पाऊस पडतोय. त्यामुळे अशा दुर्घटनेचा विचार कुणाच्याही मनात आला नव्हता. त्यामुळे ते गाढ झोपी गेले होते. पण, अचानक मध्यरात्री दोन ते अडीच्या सुमारास अनपेक्षित अशी मोठी दुर्घटना घडली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काही घरांवर डोंगराचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत घरे दबली आणि अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. अनेकांना मत्यूनं कवटाळं तर काहींना या दुर्घटनेनं कायमचं अदु करुन सोडलं आहे.

Aambeghar Satara Landslide 10 Death In Satara Aambeghar Morgiri Patan Landslides

टॅग्स :Ambeghar Landslide