उमेदवार असूनही मतदानापासून वंचित; बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले संतापले

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 1 December 2020

मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे एवढंच मी आत्ता तरी आवाहन करताे असे अभिजीत बिचुकलेंनी नमूद केले.

सातारा : मराठी बिग बाॅसफेम अभिजीत बिचुकले हे पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. आज (मंगळवार) साता-यात ते पत्नी अलंकृता यांच्या समवेत मतदानासाठी आले. परंतु त्यांचे नावच मतदार यादीत नसल्याचे त्यांना केंद्रावर समजले. 

या प्रकारामुळे बिचुकलेंनी प्रशासनासह राजकीय पक्षांवर षडयंत्राचा आराेप केला. माझी पत्नी अलंकृता यांनी मतदान केले. त्यानंतर मी माझे नाव यादीत शाेधले परंतु ते नसल्याचे समजले. पून्हा मी तेथील शासनाच्या हेल्प डेस्कवर गेलाे. तेथेही माझे नाव यादीत नसल्याचे मला सांगण्यात आले.

'पदवीधर'च्या प्रचारातील रस्सीखेचामुळे सातारकरांची मतदानातही आघाडी 

हा प्रकार निंदनीय आहे. मी स्वतः उमेदवार आहे. पदवीधर आणि शिक्षक या दाेन्हीत मी निवडणूक लढवित आहे. तरी माझे नाव यादीत नसणे म्हणजे षडयंत्रच म्हणावे लागेल. मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे एवढंच मी आत्ता तरी आवाहन करताे असे बिचुकलेंनी नमूद केले.

उदयनराजेंचे हे म्हणणे हास्यास्पद; शशिकांत शिंदेंचा टाेला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijeet Bichukale Contesting Pune Graduate Election Satara News