

Abhijit Bichukale interacting with supporters after achieving a record-breaking vote count.
Sakal
सातारा : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यामध्ये साताऱ्यात अनेक रंजक आकडेवारी समोर आली आहे. विशेषतः नेहमी चर्चेत राहणारे उमेदवार अभिजीत बिचुकले यांच्या मतांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत बिचुकलेंनी अनपेक्षित कामगिरी केली असून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे. अपक्ष उमेदवारांच्या यादीत तर त्यांनी २,७७२ मते मिळवून दुसरे स्थान मिळवले आहे.