Satara दुधेबावीचे ‘बिरदेव’ राज्यस्तरीय गजीनृत्य स्पर्धेस पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

रामराजेंकडून अभिनंदन; सांगलीतील स्पर्धेत मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक

Satara : दुधेबावीचे ‘बिरदेव’ राज्यस्तरीय गजीनृत्य स्पर्धेस पात्र

फलटण शहर : दडसवस्ती दुधेबावी ( ता. फलटण) येथील बिरदेव गजी नृत्य मंडळाने सांगली येथील गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या मंडळाची निवड झाली. त्याबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मंडळाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र शासन कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय सांगली आयोजित लोकनृत्य स्पर्धा २०२२ - २०२३ मध्ये बिरदेव गजी नृत्य मंडळाने कामगार कल्याण केंद्र सातारा यांच्यामार्फत हे लोकनृत्य सादर केले. या स्पर्धेत सातारा, सांगली, सोलापूर विभागातून नऊ संघ सहभागी झाले होते. ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक महेश पाटील, कथ्‍थक नृत्य दिग्दर्शिका मोहिनी खोत, रामकृष्ण चितळे, परीक्षक हेमंत दाभाडे, अमर कुरणे, ओंकार रकटे आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले.

लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी रामराजे यांनी या मंडळाचे अभिनंदन केले. त्यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक- निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पोलिस पाटील संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर-पाटील, साताऱ्याचे कामगार कल्याण केंद्र संचालक संदीप कांबळे आदींसह मान्यवरानी मंडळाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.