

Literary Experts Lament Lack of Mahanubhav Literature at Satara Conference
Sakal
-संजीव भागवत
सातारा : माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्या महानुभाव साहित्याचे सर्वात मोठे योगदान राहिले, त्या साहित्याचा मोठा अभाव सातारा येथे भरलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकर्षाने समोर आला. काही अपवाद वगळता या साहित्यावर कोणीतीही चर्चादेखील होऊ शकली नाही. तर दुसरीकडे संमेलनाच्या आयोजकांनी पहिल्या मराठीच्या आद्य कवयित्री महदंबा यांच्यापासून ते गोविंदप्रभू, चक्रधर, म्हाइंम भटांचा दर्शनी भागात उल्लेख होईल, असेही एकही मोठे बॅनर, चित्र लावले नसल्याने एकूणच या संमेलनात महानुभाव साहित्याची उपेक्षा झाल्याची खंत महानुभाव साहित्याचे अभ्यासक, साहित्यिकांकडून व्यक्त करण्यात आली.