शिरवळ : चारचाकी अंगावरुन गेल्याने सांगली, पुणे जिल्ह्यातील दाेघांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर
Friday, 23 October 2020

याप्रकरणी दाेन्ही चारचाकी वाहनांच्या चालकांविरूद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती स्थानिक पाेलिसांनी दिली.

सातारा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ चौपाळा येथे रस्त्याच्या पलीकडे जाणार्‍या दुचाकीला एका चार चाकीने धडक दिली. त्यामुळे  रस्त्यावर पडलेल्या दोघांच्या अंगावरून पाठीमागून आलेली दूसरी चार चाकी गेल्याने दोघजण जागीच ठार झाले. 

विठ्ठल धर्माजी पिसे (वय 58, रा. पिसेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. नायगाव) व प्रकाश लक्ष्मण लोंबर (वय 60, रा. बोपर्डी, पुणे, सध्या शिरवळ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विठ्ठल धर्माजी पिसे व प्रकाश लक्ष्मण लोंबर हे दोघे परिसरात कामास होते. ते गणेश बेसन मिलच्या दिशेने दुचाकी (क्र. एम. एच. 45 जी 5964) वरूनकामावर जात होते. शिरवळ चौपाळा येथे रस्ता आेलांडताना पुण्याच्या दिशेने जाणार्‍या एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

पासपोर्टचा कोल्हापूर कॅम्प बंद ; कोरोनातही परदेशवारीला पसंती 

यामुळे दुचाकीवर असणारे दोघेही रस्त्यावर खाली पडले. याचदरम्यान पाठीमागून वेगाने आलेल्या एका चारचाकीने (क्र. एम. एच. 02 जेपी 1727) ने जाेरात ब्रेक मारला; पण ती पडलेल्या दोघांच्या अंगावरून पुढे जाऊन थांबली. दोघांपैकी एकजण जागीच ठार झाला होता. दोघांनाही त्वरित रुग्णवाहिकेतून खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्यांना शिरवळ येथील आराेग्य केंद्रात नेण्यात आले.

खुशखबर! वेण्णालेक बोट क्‍लब पर्यटकांसाठी खुला

तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. हा अपघात गुरुवारी घडला असून याप्रकरणी दाेन्ही चारचाकी वाहनांच्या चालकांविरूद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती स्थानिक पाेलिसांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident Near Shirwal Pune Sangli Satara News