Satara Accident : 'वजराई धबधब्यानजीक मिनी बस खड्ड्यात कोसळली'; चालकाचा ताबा सुटला अन्..
कोल्हापूर जिल्ह्यातील काही पर्यटक दुपारी वजराई धबधबा पाहण्यासाठी आले होते. धबधबा पाहून परत माघारी साताऱ्याकडे येत तांबी गावच्या खालच्या बाजूला एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस मागे येऊन खड्ड्यात गेली.
Rescue operation underway after a tourist mini-bus plunged into a ditch near Vajrai Waterfall, injuring five passengers.Sakal
कास : जिल्ह्यातील प्रसिद्ध वजराई धबधबा पाहून माघारी निघालेली पर्यटकांची बस आज दुपारी तीनच्या सुमारास तांबी गावच्या खालच्या बाजूला एका अवघड वळणावर साताऱ्याकडे येत असताना दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात कोसळली.