
कऱ्हाड : दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक; तीन ठार, दोघे जखमी
मल्हारपेठ : दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण ठार झाले, तर अन्य दोघे जखमी आहेत. येथील सांगवड पुलानजीकच्या नाडे गावात काल रात्री नऊच्या सुमारास भीषण आपघात झाला. नितीन बबन तिकुडवे (वय 36, रा. शिंदेवाडी), भरत रामचंद्र पाटील (40) व बबन धोंडिबा पडवळ (65, दोघे रा. येरफळे) अशी मृतांची नावे आहेत. संकेत सिताराम शिंदे (रा. तामकणे) व अनिकेत ज्ञानदेव पाटील (रा. शिंदेवाडी) अशी जखमी आहेत. त्यांच्यावर कऱ्हाडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : नितीन तिकुडवे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच- 50 - ई - 7229) मरळीकडे ट्रिपलसीट निघाले होते. त्यांच्यासोबत अनिकेत पाटील होते. नवा रस्तानजीक सांगवड पुलाच्या जवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यांनी समोरून स्प्लेंडरवरून येणाऱ्या तिघांना धडक दिली. निष्काळजीपणे दुचाकी चालवत भरधाव वेगात विरूद्ध दिशेला जावून नवारस्त्याकडं निघालेल्या दुचाकीवर जावून नितीन यांची दुचाकी आदळली. नवारस्त्याकडे निघालेल्या हिरो स्प्लेंडरवरील (एमएचई - 2510) चालकाला जोरदार धडक बसली, त्यात नितीन तुकडवेसह भरत पाटील व बबन पडवळ ठार झाले. दोन्ही दुचाकीची धडक इतक्या जोराची होती की, दुचाकींचा चक्काचुर झाला होता.
अपघातात सगळेच गंभीर जखमी होते. त्यांना कऱ्हाडला नेण्यात आलंय. त्यावेळी नितीन तिकुडवेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. भरत पाटील व बबन पडवळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिकेत पाटील व संकेत शिंदे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विरूद्ध बाजूला जावून जोराची धडक देऊन अपघात करून स्वतः सहीत भरत पाटील व बबन पडवळ यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी नितीन तिकुडवे याच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच फौजदार अजीत पाटील, हवालदार जाधव यांनी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारास दाखल केले.
Web Title: Accident News Three Killed In Two Wheeler Accident Two Injured Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..