esakal | पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात, 1 जण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात, 1 जण जागीच ठार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव: भरधाव इनोव्हा मोटारीने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात हिंदू राष्ट्रसेना बेळगावचा कार्यकर्ता जागीच ठार झाला. तर चौघे जण गंभीर जखमी झाले. शनिवार (ता. ४) पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारानजीकच्या शिरूरजवळ हा अपघात घडला. सचिन निंगप्पा तुप्पट (वय ३२, रा. तुरमुरी) असे त्याचे नाव आहे.

हेही वाचा: निसरे फाट्यावरील अवैध धंद्यांवर कारवाई करा

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते सचिन तुप्पट हे आपल्या अन्य चार सहकाऱ्यांसह काही कामानिमित्त मुंबईला निघाले होते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून मोटारीतून जात असताना सातारानजीक शिरूर जवळ सेवा रस्त्यावरून महामार्गावर अचानक ट्रक आडवा आला. त्यावेळी भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार सरळ समोरील ट्रकला जाऊन धडकली.

यावेळी झालेल्या भीषण अपघातात मोटर चालकाच्या बाजूला बसलेले सचिन हे जागीच ठार झाले तर अन्य चौघे जण गंभीर जखमी झाले. पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान घडलेल्या या अपघातानंतर काहीनी जखमींना सातारा येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख रविकुमार कोकितकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी साताऱ्याकडे धाव घेतली आहे.

loading image
go to top