esakal | निसरे फाट्यावरील अवैध धंद्यांवर कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Shambhuraj Desai

आबदारवाडीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून पूर्णपणे दारूसह इतर अवैध धंद्यांना बंदी घातली आहे.

निसरे फाट्यावरील अवैध धंद्यांवर कारवाई करा

sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ (सातारा) : आबदारवाडी (ता. पाटण) हद्दीमध्ये निसरे फाटा येथील अवैध दारू व मटका पूर्णपणे बंद करण्याबाबत आबदारवाडी ग्रामपंचायतीचे (Aabdarwadi Gram Panchayat) सरपंच व शिवशाही सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजय शिंदे व ग्रामस्थांनी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई (Minister Shambhuraj Desai) यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. मंत्री देसाई यांनी निवेदन स्वीकारताच तातडीने कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे, की आबदारवाडी हद्दीमध्ये निसरे फाटा या ठिकाणी असणाऱ्या दुकान गाळे व घरांमध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. यामध्ये मटका जुगार, विनापरवाना दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे आसपासच्या गावांतील लोकांची वाढती गर्दी तेथे होत असल्याने तेथील राहणारे रहिवासी महिलावर्ग व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. अवैध धंदे बंद व्हावेत, यासाठी अनेक वेळा गावकऱ्यांनी जोरदार विरोध करून, तसेच तोंडी सूचना करून आजपर्यंत अवैध धंदे बंद झालेले नाहीत.

हेही वाचा: अफगाणिस्तानात तालिबानचं आज नवं सरकार; मुल्ला बरादर असणार 'प्रमुख'

आबदारवाडीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून पूर्णपणे दारूसह इतर अवैध धंद्यांना बंदी घातली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून गावच्या हद्दीमध्ये अशाप्रकारे गैरमार्गाचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. आबदारवाडी गाव स्मार्ट व सुंदर होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असून, यंदाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेसाठी गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ अहोरात्र प्रयत्न करत आहे. गावच्या हद्दीमध्ये हे अवैध धंदे असेच सुरू राहिले तर सुंदर व स्मार्ट गावाकडे वाटचाल करत असलेल्या गावाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृह राज्यमंत्री देसाई यांना मल्हारपेठ पोलिस ठाण्याच्या उद्‍घाटनप्रसंगी आबदारवाडीतील ग्रामस्थांनी निवेदन देऊन अवैध धंदे कायमचे हद्दपार करण्यासाठी निवेदन दिले आहे.

हेही वाचा: बाल गणेशाने इथेच मारला सिंदुरासुरास

loading image
go to top