बीड जिल्ह्यातील सहा वर्षाच्या मुलीचा ट्रॅक्‍टरखाली सापडून मृत्यू

गजानन गिरी
Friday, 4 December 2020

या घटनेचा तपास सहायक फौजदार तावरे करत आहेत.

मसूर (जि. सातारा) : येथील पोलिस दूरक्षेत्रानजीक मसूर- शामगाव रस्त्यावर उसाच्या ट्रॉलीला ओलांडताना अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील ऊसतोडणी मजुराच्या लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी बुधवारी घडली.

ऋतुजा महादेव सरवदे (वय सहा, मूळ रा. वारोळा, ता. माजलगाव, जि. बीड, सध्या रा. मसूर) असे मृत मुलीचे नाव आहे. ऊसतोडणी मजूर महादेव विठ्ठल सरवदे हे पत्नीसह मुलीला घेऊन मोटारसायकलवरून चिखलीला ऊसतोडणीसाठी गेले होते.

सातारा : राष्ट्रवादी पून्हाचा गजर लागला घुमू

शामगाव रस्त्याने मसूरकडे परतताना समोरून उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टरला दुचाकीस्वार पाठीमागून ओलांडताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. त्या वेळी ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील चाक अंगावरून गेल्याने ऋतुजाचा जागीच मृत्यू झाला. सहायक फौजदार तावरे तपास करत आहेत.

राजकीय फायदयासाठी समाजाचा बळी देत आहात; मराठा क्रांती मोर्चाचे शशिकांत शिंदेंना खडेबाेल 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident Of Six Year Old Girl In Masur Satara

Tags
टॉपिकस
Topic Tags: