Car badly damaged in a serious accident on Pune–Bengaluru highway; four devotees injured.
Sakal
सातारा
Karad Accident: देवदर्शन घेऊन पुण्याकडे परतताना अपघात; चौघे जखमी, पुणे- बंगळूर महामार्गावरील घटना, मोटारीचा चक्काचूर!
four injured in Pune Bengaluru highway car crash: पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; देवदर्शनाहून परतताना चौघे जखमी
मलकापूर: महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मोटारची पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली.

