
करपेवाडीतील महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून खून झाला होता.
महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून खून; तब्बल साडेतीन वर्षांनंतर आरोपी गजाआड
ढेबेवाडी (सातारा) : ढेबेवाडी (Dhebewadi) विभागातील करपेवाडी (ता. पाटण, जि. सातारा) येथील भाग्यश्री संतोष माने (वय १८) या महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून झालेल्या हत्येच्या घटनेचा तब्बल साडेतीन वर्षांनी पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) काही संशयितांना ताब्यात घेतल्याचं समजतंय. ही हत्या अंधश्रद्धेतून झाली की, अन्य कोणत्या कारणातून याचा उलगडा लवकरच पोलिसांकडून केला जाईल, असा अंदाज आहे.
करपेवाडीच्या शिवारात २२ जानेवारी २०१९ रोजी ही घटना उघडकीस आली होती. भाग्यश्री माने (Bhagyashree Mane) हीचा मृतदेह त्या दिवशी दुपारी गावालगतच्या शिवारात गळा चिरलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्या दिवशी सकाळी ती कॉलेजला जाते, असे सांगून घरातून निघून गेल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांनी सांगितले होते.
हेही वाचा: NCP : महाराष्ट्रात सत्ताबदल होताच राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!
विविध पातळ्यांवर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र, साडेतीन तीन वर्षे उलटूनही नेमके संशयित व हत्येमागचे कारण स्पष्ट होत नसल्याने जनतेत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पोलीस यंत्रणेने विविध पातळ्यांवर या प्रकरणाचा कसून तपास सुरूच ठेवला होता. अखेर त्यांच्या अथक तपासाला यश येवून हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच पोलिसांकडून या घटनेच्या तपासात तपशील समोर येईल, असा अंदाज असून ढेबेवाडी खोऱ्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्याबद्दल मोठी उत्सुकता आहे.
Web Title: Accused Arrested In Case Of Murder Of College Girl Dhebewadi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..