NCP : महाराष्ट्रात सत्ताबदल होताच राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील धक्के बसू लागले आहेत.
NCP vs BJP
NCP vs BJP esakal
Updated on: 
Summary

शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील धक्के बसू लागले आहेत.

सोलापूर : शिवसेना पक्षातून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आतापर्यंत ठाकरेंना अनेक धक्के दिले आहेत. आता राष्ट्रवादीचे काही माजी आमदार NCP प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांना धक्के देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील धक्के बसू लागले आहेत.

आता सोलापूरच्या मोहोळमधील (Mohol Constituency) राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी या चर्चेला दुजोरा दिलाय. त्यामुळं येत्या काळात सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसू शकतो. मोहोळ तालुक्यातील स्थानिक राजकारणामुळं राजन पाटील भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

NCP vs BJP
पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करणार; उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

शरद पवार यांच्याकडून राजन पाटील यांना भेटीचा निरोप देण्यात आला होता. मात्र, ही भेट झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, राजन पाटील यांच्याकडून देखील आम्ही सत्तेसाठी हपापलेली माणसं नसून आमच्यासाठी स्वाभिमान महत्त्वाचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. भाजप प्रवेशाबाबत त्यांनी माहिती नसल्याचं म्हणत या विषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.

NCP vs BJP
..म्हणून तिसऱ्या दिवशी माझी सेनेतून हकालपट्टी केली : आढळराव पाटलांनी सांगितलं 'कारण'

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये (BJP) जाण्याची भूमिका असल्याची माहिती साठे यांनी दिलीय. त्यामुळं राजन पाटील कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam additional water demand for Sangli
Sangli District Bank Election Strategy
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com