
नागरिकांनी नियम मोडल्यास कारवाई; जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा : कोरोना संसर्गाच्या(corona) पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने(satara administration) घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. ३१ डिसेंबरच्या(31 december ) पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. या काळात हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिस विभागाने कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह(satara collector shekhar sinh) यांनी दिले आहेत.
हेही वाचा: ओमिक्रॉन : राज्यात कठोर निर्बंध लागू, जाणून घ्या नियमावली
कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतची आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आयोजित केली होती. या वेळी जिल्हाधिकारी सिंह बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: राज्यात कोरोनाबाबतचे कठोर निर्बंध ! जाणून घ्या सरकारने जारी केलेली नवी नियमावली
जिल्ह्यातील खासगी आस्थापनांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जे खासगी आस्थापना नियमांचे पालन करणार नाही, अशांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना सिंह यांनी केल्या. पोलिस विभागाने ज्या ठिकाणी विवाह व सार्वजनिक समारंभ होत आहे, तेथे भेट देऊन तपासणी करावी. नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यात यावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आत्तापासून सर्व साधनसामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे, अशाही सूचना सिंह यांनी केल्या आहेत.
३१ डिसेंबरच्या मार्गदर्शक सूचना
बंदिस्त सभागृहात आसनक्षमतेच्या ५० टक्के मर्यादा
खुल्या जागेत आसनक्षमतेच्या २५ टक्के मर्यादा
फटाक्यांच्या आतषबाजीला बंदी
पर्यटनस्थळी गर्दी करू नये
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुकांचे आयोजन करू नये
Web Title: Action If Citizens Break The Rules Collector Shekhar Singh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..