प्राथमिक शिक्षक संघटनेचे नाव वापरल्यास कारवाई : ढमाळ

अशपाक पटेल
Sunday, 22 November 2020

प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि न्याय्य हक्कासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेची स्थापना (कै.) शिवाजीराव पाटील यांनी केली. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ त्यांच्याच नेतृत्वाखाली आजपर्यंत काम करीत आला आहे. मध्यंतरी संघटनांच्या विविध घडामोडीनंतर काही जण अधिकृत संघटनेच्या नावाचा वापर करून वावरत आहे. कायदेशीररीत्या हे चुकीचे असल्याचे मत मच्छिंद्र ढमाळ यांनी व्यक्त केले.

खंडाळा (जि. सातारा) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक (कै. शिवाजीराव पाटील) या संघटनेचे नाव वापरून काही जण जिल्हा परिषद आणि इतर ठिकाणी कामकाज करत आहे. यापुढे संघटनेच्या नावाचा बेकायदेशीर वापर होताना आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पत्रकाद्वारे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ यांनी दिला. 

प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि न्याय्य हक्कासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेची स्थापना (कै.) शिवाजीराव पाटील यांनी केली. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ त्यांच्याच नेतृत्वाखाली आजपर्यंत काम करीत आला आहे. मध्यंतरी संघटनांच्या विविध घडामोडीनंतर काही जण अधिकृत संघटनेच्या नावाचा वापर करून वावरत आहे. कायदेशीररीत्या हे चुकीचे आहे. राज्य संघटनेने जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केली असतानाही या संघटनेचे नाव वापरून इतर काही जण जिल्हा परिषद आणि इतर ठिकाणी कामकाज करताना दिसत आहे.

प्रतापगडच्या गळीतास कामगारांचा विरोध; आक्रमक पवित्र्याने कारखाना प्रशासनाला जाग येणार? 

यापुढे संघटनेच्या नावाचा बेकायदेशीर वापर होताना आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विषय समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून राज्याच्या धोरणानुसार अधिकृत संघटनेचे प्रतिनिधीच घेतले जावेत, अशा पद्धतीचा ठराव आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विषय समितीवर जिल्हाध्यक्ष ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी घ्यावा, अशीही मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action If The Name Of The Primary Teachers Association Is Used Satara News