
श्रीमती ठोके यांचे पार्थिव आज सकाळी सहा वाजता कऱ्हाड येथे आणले गेले. मंगळवार पेठेतील कमळेश्वर मंदिरनजीकच्या त्यांच्या निवासस्थानी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकांरानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर कऱ्हाडमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कऱ्हाड (जि. सातारा) : येथील ज्येष्ठ अभिनेत्री व माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके (वय 74) यांचे काल (ता. 14) सायंकाळी बंगळूर येथे निधन झाले. त्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर बंगळूर येथे उपचार सुरू होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत त्या "जिजी' म्हणून ओळखल्या जात होत्या. झी मराठी वाहिनीवरील "लागीर झालं जी' या मालिकेतून त्या घराघरांत पोचल्या.
श्रीमती ठोके यांनी शिक्षकी पेशा सांभाळत अभिनय जागृत ठेवला. रंगभूमीवरील नाटक, राज्य नाट्य स्पर्धांत त्या सक्रिय होत्या. मराठी चित्रपटसृष्टीतही काम करताना "सासर माहेर', "सख्खा भाऊ पक्का वैरी', "कुंकू झालं वैरी', "भरला मळवट', "बरड' अशा चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. शिक्षिकी पेशातील निवृत्तीनंतरही त्यांनी अभिनय सोडला नाही. अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आलेली झी मराठीची "लागीर झालं जी' या मालिकेत "जिजी'ची भूमिका त्यांनी साकरली. त्याद्वारे त्या घराघरांत पोचल्या.
लागिरं झालं जी फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन; कऱ्हाडात आज (रविवार) अंत्यसंस्कार
श्रीमती ठोके यांचा पार्थिव आज सकाळी सहा वाजता कऱ्हाड येथे आणले गेले. मंगळवार पेठेतील कमळेश्वर मंदिरनजीकच्या त्यांच्या निवासस्थानी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकांरानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर कऱ्हाडमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी मराठी चित्रपटातील व टीव्ही मालिकांतील अनेक कलाकार उपस्थित होते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे