Adani Tarale Pumped Storage Project : तारळे पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाला वन विभागाचा दणका; अदानी समूहाकडून 227 कोटी रुपये वसूल करणार, वनमंत्री गणेश नाईक यांच्या बैठकीत निर्णय

Adani Tarale pumped storage project latest news : पाटण तालुक्यातील तारळे येथील अदानी समूहाच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी २२७ कोटींचा वन संवर्धन निधी भरावा लागणार आहे. तोपर्यंत प्रकल्पाची वर्क स्टॉप नोटीस कायम राहणार आहे.
Tarale pumped storage project Patan Satara news

Tarale pumped storage project Patan Satara news

esakal

Updated on: 

-सचिन शिंदे

कराड : पाटण तालुक्यातील तारळे परिसरात उभारण्यात येत असलेल्या अदानी समूहाच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी कंपनीला नियमानुसार २२७ कोटी रुपयांची रक्कम सह्याद्री व्याघ्र संवर्धनासाठी भरावी लागणार (Tarale pumped storage project Patan Satara news) आहे. प्रकल्पाच्या मूळ ५ हजार ६७५ कोटी रुपयांच्या खर्चाच्या चार टक्के ही रक्कम असून, मुख्य प्रकल्पाच्या मंजुरीच्या वेळी ती वसूल केली जाणार आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याची माहिती वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Adani Maharashtra Project Controversy
Adani 5700 Crore Project
Adani Project Cost Reduction Hydropower Project
Adani 2700 MW project latest update