Tarali pumped storage project forest department notice
esakal
-सचिन शिंदे
कराड : राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी न घेताच पाटण तालुक्यातील तारळे परिसरात अदानी समूहाच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत वन विभागाने १३ नोव्हेंबरला प्रकल्पाचे सर्व कामकाज तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आदेश देऊन आठवडाभर उलटला तरी कंपनीकडून प्रकल्पाचे काम सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वन विभागाच्या आदेशाला कंपनीने केराची टोपली दाखवल्याची चर्चा परिसरात सुरू (Patan forest department show cause notice) आहे.