

Tarli Pump Storage Project Adani Green Energy Faces Local Complaints Government Schedules Important Meeting on November 20
sakal
कऱ्हाड: पाटण तालुक्यातील तारळी परिसरात अदानी ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या १५०० मेगावॉट क्षमतेच्या पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या गंभीर तक्रारींची अखेर मंत्रालय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. डोंकवाडी, केजळवाडी आणि काळणे येथील ग्रामस्थांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबरला दौलतनगर येथे उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत प्रकल्पाचे स्थानिक जलस्रोत, पाणीपातळी, पर्यावरण आणि प्रस्तावित बांधकामांच्या परिणामांबाबत काय निर्णय होतो, त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.