Aditya Thackeray
Aditya Thackerayesakal

'तुमच्याही मतदारसंघात गद्दार आहेत, त्यांना तुम्ही पुन्हा निवडून देणार का?' आदित्य ठाकरेंचा देसाईंना उद्देशून रोखठोक सवाल

घटनाबाह्य मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या हक्काचा घास गुजरातच्या घशात घालत आहेत.
Summary

स्वतःला खोके अन् जनतेला धोके देणाऱ्यांचे महाराष्ट्रातील सरकार हिंमत नसणारे आणि अधिकाऱ्यांच्या मागे लपणारांचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ढेबेवाडी : विधानभवनात बसून कोण खरे? कोण खोटे? हे कागदावर ठरवून काय उपयोग आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल ठरला आहे. आगामी निवडणुकीतच खरा निकाल लागेल आणि महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट होईल, असा विश्वास युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी तळमावले (ता. पाटण) येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केला.

दरम्‍यान, स्वतःला खोके अन् जनतेला धोके देणाऱ्यांचे महाराष्ट्रातील सरकार हिंमत नसणारे आणि अधिकाऱ्यांच्या मागे लपणारांचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सातारा जिल्हा व पाटण तालुका शिवसेना व युवा सेनेने सभेचे आयोजन केले होते. ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, ‘‘हे वर्ष महत्त्वाचे वर्ष आहे. जगातील अनेक देश यावर्षी निवडणुकीला सामोरे जात असले तरी सर्वांचे लक्ष भारताकडेच आहे.’’

Aditya Thackeray
Loksabha Election : निवडणुकीत काकांचा 'खांद्यावर हात पॅटर्न' नाही चालणार; काँग्रेस आमदाराचा BJP खासदाराला टोला

घटनाबाह्य मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या हक्काचा घास गुजरातच्या घशात घालत आहेत. बेरोजगारीचा प्रश्न राज्यात गंभीर बनला आहे. दोनशे गुणांच्या तलाठी भरती परीक्षेत २१४ मार्क्स मिळाले आहेत. डीजेवर नाचायला युवक जन्‍माला आलेले नाहीत. त्यांना नोकरी व रोजगार मिळण्यासाठी आम्ही लढत आहोत. शेतीपुढे नवनवीन आव्हाने उभी आहेत. अंगणवाडी सेविका व जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. मात्र, आश्वासनाखेरीज पदरात काही पडत नाही.

Aditya Thackeray
'दुसऱ्याचा प्रचार किती दिवस करायचा? प्रतीक पाटलांना हातकणंगलेची उमेदवारी द्या'; जयंत पाटलांना कार्यकर्त्यांचे साकडे

तुमच्याही मतदारसंघात गद्दार आहेत. त्यांना तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात काय? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना विचारला. हर्षद कदम यांनी प्रास्ताविकात पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. ठेकेदार आणि दीडशे कार्यकर्ते सोडून कुणाचेच भले झाले नसल्याचा आरोपही त्‍यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com