दरडग्रस्त गावांत प्रशिक्षण पूर्ण; पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Administration ready for flood emergency 200 homeguards will assisted by nine boats satara

दरडग्रस्त गावांत प्रशिक्षण पूर्ण; पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज

सातारा : मॉन्सूनची चाहूल लागू लागल्याने जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, जय्यत तयारीही केली आहे. दरडग्रस्त १२४ गावांतील नागरिकांत जागृत्तीबाबत प्रशिक्षणे घेतली आहेत. पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे नऊ बोटींची तपासणीही करण्यात आली आहे. त्यासाठी दोनशे होमगार्डस्‌ना प्रशिक्षण दिले आहे. दरडी कोसळणाऱ्या घाट रस्त्यांवर बांधकाम विभागाला आतापासूनच सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मॉन्सूनसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सर्व तयारीनिशी सज्ज आहे.

जिल्ह्यात मागील पावसाळ्यात दरडी कोसळून १४ गावे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली होती. यातून बोध घेऊन आता आगामी पावसाळ्यात या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. त्यांनी आपत्तीचा सामना करण्यासाठी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात दरडग्रस्त १२४ गावे आहेत. महाबळेश्वर, पाटण, जावळी व सातारा तालुक्यांत ही गावे आहेत.

पावसाळ्यात दुर्गम भागात दरडी कोसळणे, घाट रस्ते खचणे, मातीचे भराव कोसळण्याच्या घटना घडतात. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अशा काही घटना घडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनास कळवण्याबरोबर सुरक्षितस्थळी जाणे गरजेचे आहे. लोकांना अशा परिस्थितीत तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

- देविदास ताम्हाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सातारा

Web Title: Administration Ready For Flood Emergency 200 Homeguards Will Assisted By Nine Boats Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top