esakal | कऱ्हाडला खासगी जागेतील फ्लेक्स जाहिरात करवसुलीची डोकेदुखी
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडला खासगी जागेतील फ्लेक्स जाहिरात करवसुलीची डोकेदुखी

थकितांना केवळ नोटीस बजावण्यासह पालिकेने फ्लेक्स जप्तीचीही कारवाई करण्याची गरज आहे.

कऱ्हाडला खासगी जागेतील फ्लेक्स जाहिरात करवसुलीची डोकेदुखी

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): शहरातील वाढदिवसासहीत पालिका पुरस्कृत फ्लेक्स लावण्यास पालिकेने शहर सौंदर्यीकरणातंर्गत ठराव घेवून बंदी घातली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे जाहिरात फ्लेक्स मुक्त आहेत. शहरातील २५ हून अधिक खासगी ठिकाणी उभारलेले जाहिरात फ्लेक्स त्याच सौंदर्याला बाधा आणताहेत. त्यातील काही फ्लेक्स कित्येक वर्ष झळकताहेत त्यांचे मालकच पालिकेला माहिती नाहीत. त्यासहीत बहुतांशी फ्लेक्सचा कर थकीत आहे. त्यामुळे पालिकेचे लाखोंचे उत्पन्न बुडते आहे. थकितांना केवळ नोटीस बजावण्यासह पालिकेने फ्लेक्स जप्तीचीही कारवाई करण्याची गरज आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

शहराने स्वच्छ सर्वेक्षणात देशात दोन वेळा व वसुंधरा, माझी वसुंधरा अभियानात नाव उंचावले. त्यातंर्गत शहर सौंदर्यीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले. त्यात चौक सुधार योजना, कारंजे यासरख्या योजना राबविल्या गेल्या. त्या राबविताना शहरातील फ्लेक्सला मात्र बंदी घातली. सर्वात आदी पालिकेच्या सार्वजनिक जागा फ्लेक्स व जाहिराती फलकमुक्त करण्यात आल्या. नेहमी फ्लेक्सने गजबजलेला बस स्थानक परिसर फ्लेक्समुक्त केला. तेथील १३ सार्वजनिक होर्डींग पालिकेने काढली. त्यासह शहरातील सर्व कमानीवरील जाहिराती हटल्या. पालिकेने वाढदिवस, अभिनंदनाच्या होर्डींगवरही बंदी आणली. मात्र खासगी ठिकाणचे फ्लेक्स व जाहिरातींचे होर्डींग्ज पालिकेचे खरे डोकेदुखी ठरले.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

शहरात १३ फ्लेक्सला परवानगी असल्याची माहिती पालिकेतून मिळते. मात्र उर्वरीत सर्वच फ्लेक्सधारक पालिकेचा लाखोंचा कर बुडवत आहेत. पालिका तीन ते पाच रूपये स्वेअर फुटाने (जुना दर) पैसे आकारत असतानाही त्याची लाखोंची कर थकीत आहेत. तेच फ्लेक्स धारक जाहिराती देणाऱ्यांकडून प्रती स्क्वेअर सेंटीमिटला शेकड्याच्या दरात होणारी पैशाची आकारणी अधिक महत्वाची आहे. तरिही त्या फ्लेक्स धारकांची कर वसुली थकीत आहे. काही फ्लेक्सचे मालक कोण आहेत. याचीच माहिती पालिका पदाधिकाऱ्यांनी नाही. ते केवळ नोटीस बजावत आहेत. त्या ऐवजी त्या इमारतीत शिरून त्या फ्लेक्सच्या जप्तीचे धाडस दाखविल्यास मोठ्या प्रमाणात कर वसुली होवू शकते. मात्र ती मानसिकता पालिकेची हवी, ती न भरण्याची मानसिकता त्या फ्लेक्स धारकाना मिळणाऱ्या राजकीय पाठबळाचा अधिक ठळक करत आहे.

हेही वाचा: कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक;पाहा व्हिडिओ

घेणे हजारात, कर भरणे शेकड्यात

फ्लेक्सचा व्यवसाय असणाऱ्यास कोणत्या तरी नगरसेवकाची साथ असते. तीच साथ कर चुकविण्यास बळ देते. जाहिराती करणाऱ्यांकडून हजोरोने व मन मानेल तेवढे पैसे उकळणारा फ्लेक्स धारक पालिकेची शेकड्यातील कर वुसली बुडवतो हेच लॉजिक वर्षानुवर्षे वापरले गेल्याने आज त्या फ्लेक्सच्या वुसलीचा आकडो लाखोंवर गेला आहे. त्यामुळे त्याच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना खास आदेश पालिकेला द्यावा लगतो. तर फ्लेक्सची थकीत वसुली न झाल्यास कारवाईचा इशारा मुख्याधिकारी रमाकांत यांनाही द्यावा लागतो. यात यातच सार सामावलेले आहे.

loading image
go to top