esakal | कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार
sakal

बोलून बातमी शोधा

karhad

कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ती पदे तातडीने भरावी, यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक मंत्री बच्चू कडू, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, जिल्हाध्यक्ष अजित बानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ सप्टेंबरपासून उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रहार संघटनेचे मनोज माळी व सहकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

हेही वाचा: महाबळेश्वरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवले

प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित बानगुडे, शिवाजी चव्हाण, महेश शिंदे, अमोल करांडे, सतीश पाटील, प्रवीण शिंदे, मधुकर शिंदे, युवराज शिंदे, जयवंत मोरे, जयदीप आचार्य, बंटी मोरे, आशिष जाधव आदी उपस्थित होते. निवेदनातील माहिती अशी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई चव्हाण यांच्या नावाने येथे सुरू असलेले उपजिल्हा रुग्णालय गरिबांच्या दृष्टीने महत्त्वाचे रुग्णालय आहे.

कऱ्हाड शहर, तालुका, पाटण, इस्लामपूर, कडेगाव, खटाव, वाळवा, विटा तालुक्यांतील हजारो रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालयात एमडी फिजिशियन, ऑर्थोपेडिक, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी भिषक, दंत शल्यचिकित्सक, परिसेविका सिटीस्कॅन मशिन तज्ज्ञ, एमआरआय मशिन तज्ज्ञ पदे रिक्त आहेत.

त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी अनेकदा उपोषण, आंदोलन करण्यात आले. मात्र, लक्ष दिले जात नाही. ती पदे भरावी, यासाठी २१ सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

loading image
go to top