
शेणोली : रेठरे बुद्रुक व शेणोली या गावांजवळील गोंदी गावाची सुवासिक इंद्रायणी तांदळासाठी सातासमुद्रापार ओळख आहे. गावातील इंद्रायणी तांदळाचे ग्राहक राज्यासह परदेशात आहेत. मात्र, या गावाला तीन दशकांपासून एसटीच येत नव्हती. ग्रामपंचायत व युवकांच्या पाठपुराव्यातून तब्बल ३५ वर्षांनंतर गावात एसटी आल्याने गावकऱ्यांचे चेहरे हरखले.