
कऱ्हाड : कृष्णा नदीत मगर असल्याची वन विभाग खात्री देत आहे. पाच वर्षांपासून येथील कृष्णा नदीत दिसणारी मगर कालपासून कोयना नदीपात्रात शहरातील शुक्रवार पेठेलगतच्या बाजूला दिसू लागली आहे. त्यामुळे कृष्णेसोबतच आता कोयना नदीकाठावरील स्थानिकांत घबराटीचे वातावरण आहे. कोयनेच्या पात्रात पहिल्यांदाच मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांत औत्सुक्यासह भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी सावध राहावे, घाबरून जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.