युवक कॉंग्रेसचे साताऱ्यात आंदोलन; मोदी, कर्नाटक सरकारचा नोंदविला निषेध

उमेश बांबरे
Monday, 10 August 2020

कॉंग्रेस भवनासमोर हातात निषेधाचे फलक घेऊन युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी युवकांच्या हाताला काम हवे, हमे रोजगार दो..असे म्हणत युवकांनी भाजप व मोदी सरकारचा निषेध नोंदविला. 

सातारा : "युवकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, मोदी सरकार हाय हाय.., युवक कॉंग्रेसचा विजय असो.., राहुल गांधींचा विजय असो.., कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध.., छत्रपती शिवाजी महाराज की जय.., भाजप सरकारचा जाहीर निषेध.., जय भवानी जय शिवाजी..,'अशी घोषणाबाजी करत युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकताच मोदी सरकार व कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला.
काय सांगता... दहा रुपयांत मिळणार एलईडी बल्ब!

देशात वाढलेल्या बेरोजगारीच्या विरोधात प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे व युवक कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवनासमोर आंदोलन झाले. यावेळी मनगुत्ती (ता. हुक्केरी) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. कॉंग्रेस भवनासमोर हातात निषेधाचे फलक घेऊन युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी युवकांच्या हाताला काम हवे, हमे रोजगार दो..असे म्हणत युवकांनी भाजप व मोदी सरकारचा निषेध नोंदविला.

पाऊस मदतीला; पण सोसाट्याच्या वाऱ्याने घात  

तसेच "युवकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, मोदी सरकार हाय हाय.., युवक कॉंग्रेसचा विजय असो.., राहुल गांधींचा विजय असो..,' अशी घोषणाबाजी केली. तसेच कर्नाटक राज्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविल्याच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध.., छत्रपती शिवाजी महाराज की जय.., भाजप सरकारचा जाहीर निषेध.., जय भवानी जय शिवाजी..,अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे, प्रदेश चिटणीस ऋषिकेश ताटे, दादासाहेब काळे, नितीन पाटील, तसेच युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबईकरांसाठी तब्बल सात तास मॅनहोलपाशी दिला खडा पहारा, स्वतःच घर मात्र पावसात गेलं वाहून

रिया चक्रवर्तीनंतर ईडी करणार निर्माता संदीप सिंहची चौकशी 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation Against Karnataka And Modi Government In Satara By Youth Congress