'बहुजनांच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा बांधवांना आरक्षण द्या'; खंडाळ्यात बहुजनांचा एल्गार

'बहुजनांच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा बांधवांना आरक्षण द्या'; खंडाळ्यात बहुजनांचा एल्गार
Updated on

खंडाळा (जि. सातारा) : बहुजनांच्या आरक्षणाला धक्का न लावता, स्वतंत्र प्रवर्गातून मराठा आरक्षण द्यावे, तसेच मुस्लिम समाजालाही पाच टक्के आरक्षण द्यावे, सन 2021 ची जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी महामार्गावर हलगी, गजीनृत्य या पारपंरिक वाद्यांसह संविधानाची प्रत घेऊन खंडाळा तहसीलदार कार्यालयापर्यंत बहुजन आरक्षण बचाव समितीकडून आज (बुधवारी) दुपारी भव्य मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, तहसीलदार दशरथ काळे यांना बहुजन समाजातील युवतींकडून निवेदन देण्यात आले. यावळी तेली, कातकरी, कैकाडी, मुस्लिम व इतर बहुजन समाजातील महिला-युवती व नागरिक आपआपल्या समाजाचे झेंडे घेऊन मोर्च्यात सहभागी झाले होते. दरम्यान, पंचायत समिती आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मोर्चात ज्येष्ठ नेते बाळासाहेब बागवान, आनंदराव शेळके, रफिक खान या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी राजेंद्र नेवसे, रामदास कांबळे, रमेश धायगुडे, सारिका माने, गुरुदेव बरदाडे यांनी उस्थितांना मार्गदर्शन केले. कायदा सुव्यवस्थेसाठी फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com