
मोरगिरी: पाटण तालुक्यातील धनगर समाजाने अनेक दशकांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची मागणी केली होती, ती आज पूर्णत्वास जात आहे. हे स्मारक केवळ वास्तू नाही, तर समाजाच्या आत्मगौरवाचे प्रतीक आहे. या संकुलातून समाजाला शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक प्रगतीसाठी नवे व्यासपीठ मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.