
शाहूनगर : येथील गोडोली येथून किल्ले अजिंक्यताऱ्याकडे जाणारा रस्ता आठ दिवसांपूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आला; परंतु या नवीन रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुन्हा खोदकाम करण्यात आले. त्यामुळे या भागातील नागरिकांकडून प्राधिकरणाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.