esakal | वाह, क्या बात है! निंबोडीच्या 'आकाश'ची लेफ्टनंट पदाला गवसणी
sakal

बोलून बातमी शोधा

Akash Shelke

निंबोडी (ता. खंडाळा) गावचे सुपुत्र आकाश संजय शेळके यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.

वाह, क्या बात है! निंबोडीच्या 'आकाश'ची लेफ्टनंट पदाला गवसणी

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : निंबोडी (ता. खंडाळा) गावचे सुपुत्र आकाश संजय शेळके (Akash Shelke) यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात (Indian Army) लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. सेवानिवृत्त सुभेदार मेजर व ऑनररी (मानद) लेफ्टनंट संजय तुकाराम शेळके यांचे चिरंजीव, तर निंबोडीचे माजी सरपंच तुकाराम राजाराम शेळके यांचे ते नातू आहेत. भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट (lieutenant in Indian Army) पदाला गवसणी घालणारा निंबोडी व लोणंद परिसरातील तो पहिला युवक ठरला आहे. (Akash Shelke From Nimbodi Has Been Selected As A Lieutenant In The Indian Army)

डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (Indian Military Academy In Dehradun) येथे लेफ्टनंट जनरल आर. पी. सिंग यांच्या उपस्थितीत नुकतीच पासिंग आउट परेड झाली. त्या वेळी गोपनीयतेची शपथ देऊन आकाश यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public School), तर सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये (Satara Military School) झाले.

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी क्लासेसची गरज नाही : तेजस्विनी चोरगे

नांदेड येथील शासकीय महाविद्यालयात अभियंता शिक्षण घेताना केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Central Public Service Commission) तयारी केली. २०१६ मध्ये युपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर २०१७ मध्ये खडकवासला (पुणे) येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी येथे प्रशिक्षण घेतले. त्या वेळीच त्याने पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमी येथे एक वर्षाचे मिलिटरी ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आज त्यांची सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.

Akash Shelke From Nimbodi Has Been Selected As A Lieutenant In The Indian Army

loading image