महाराष्ट्रातील मावळ्याने आफ्रिकेतील शिखरावर फडकावला तिरंगा

संदीप गाडवे
Tuesday, 23 February 2021

महाराष्ट्राच्या या मावळ्याचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. 

केळघर (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यातील दुर्गम मोळेश्वर येथील अक्षय सुनील जंगम या युवकाने जगातील उंच समजल्या जाणाऱ्या आफ्रिका खंडातील किलीमांजारो हे शिखर सर करत भारताचा तिरंगा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि बरोबर नेलेल्या पाच किल्ल्यांच्या मातीचे पूजन करून शिवजयंतीही थाटात साजरी केली. ही माेहिम 360 एक्‍सप्लोररमार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षयने शुक्रवारी (ता. 19) दुपारी तीन वाजता पुर्ण केली.
 
अक्षय जंगम हा एक खासगी कंपनीत काम करत असून, लहानपणापासून त्याला गिर्यारोहणाची आवड आहे. "स्टार्ट-अप इंडिया'मार्फत भारत सरकारद्वारे प्रमाणित असणारी कंपनी 360 एक्‍सप्लोररमार्फत या मोहिमेचे आयोजन केले गेले होते. आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून, याची उंची समुद्र सपाटीपासून 19,341 फूट आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, उणे तापमानात व वादळी वाऱ्यातही अक्षयने ही मोहीम पूर्ण केली आहे. अक्षयने या मोहिमेसाठी खडतर शारीरिक सराव केला आहे. सहा दिवसांची मोहीम अक्षयने चार दिवसांतच पूर्ण करून शिवजयंती साजरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या मावळ्याचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. 

माझ्यासाठी व पूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अत्यंत त्रासात आणि प्रतिकूल वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा माझ्या मनात होती. माझे कुटुंब, आनंद बनसोडे व महाराष्ट्रातील तमाम लोकांमुळे हे यश मिळाले आहे. माझे हे यश महाराजांना मी समर्पित करत आहे. 

- अक्षय जंगम, गिर्यारोहक 

शिवजयंती दिवशी अशी मोहीम करून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान करण्याचे भाग्य 360 एक्‍सप्लोररमार्फत लाभल्याचा सर्वोच्च अभिमान वाटत आहे. अक्षयसारखे युवक सर्वांपुढे आदर्श आहेत.

- आनंद बनसोडे, 360 एक्‍सप्लोरर 

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा झाला निर्णय

जवान गौरव ससाणेंनी दोन अतिरेक्‍यांना धाडले यमसदनी

थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन

मेकअप करून ऑफिससाठी व्हा झटपट तयार! जाणून घ्या सोप्या टिप्स  

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Jangam From Mahableshwar Climbed Mount Kilimanjaro Satara Trending News