esakal | साताऱ्यात कोरोनाचा कहर; पोलिस बंदोबस्तात निढळच्या सर्व सीमा बंद

बोलून बातमी शोधा

Nidhal Village
साताऱ्यात कोरोनाचा कहर; पोलिस बंदोबस्तात निढळच्या सर्व सीमा बंद
sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निढळ ग्रामपंचायतीने कंबर कसली असून, गावात प्रवेश करणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आजपासून 9 मेपर्यंत अत्यावश्‍यक सेवा, आपत्कालीन परिस्थिती सोडून विनाकारण गावात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी ही बंदी करण्यात आल्याचा निर्णय ग्रामदक्षता समितीने घेतला आहे.

गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सीमेवरील तपासणी नाक्‍यावर 24 तास ग्रामस्तरीय समिती सदस्य, तसेच पोलिस तैनात राहणार असून, वाहनांची, तसेच बाहेरून येणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचा भंग करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत निढळ येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक नागरिकाने कोरोनाला हरवण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती सरपंच बायडाबाई ठोंबरे यांनी दिली. या वेळी उपसरपंच श्रीकांत खुस्पे, ग्रामविस्तार अधिकारी बबन ढेंबरे व ग्रामदक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

कवठ्यातील बगाड यात्रा रद्द; ग्रामस्थ, पोलिसांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

Edited By : Balkrishna Madhale