esakal | कवठ्यातील बगाड यात्रा रद्द; ग्रामस्थ, पोलिसांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

बोलून बातमी शोधा

Bagad Yatra
कवठ्यातील बगाड यात्रा रद्द; ग्रामस्थ, पोलिसांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
sakal_logo
By
पुरुषोत्तम डेरे

कवठे (सातारा) : येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची बगाड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. गेल्या वर्षा कोरोनामुळे यात्रा झाली नाही. यंदाही कोरोनामुळे बगाड यात्रा साजरी न करण्याचा निर्णय ग्रामस्थ, पोलिस व अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांनी बैठकीत दिली.

ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा आज शनिवारी (ता. 1) व रविवारी (ता. 2) मे रोजी होणार आहे. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यात्रा भरविण्यास, बगाड काढणे, पालखी, मिरवणूक, तसेच इतर कार्यक्रमास बंदी असल्याने कोणीही गर्दी करू नये. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सर्वांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दहा दिवसांच्या एकांतवासातून बरंच काही शिकलो अन् कोरोनाला हरवलोच!

Edited By : Balkrishna Madhale