esakal | बैलांवर शेतकरी अत्याचार कसा करेल? निवृत्त न्यायमूर्तींचा सरकारला सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Bullock Cart Race

अनेकदा बळिराजा आणि बैलाचे भावनिक बंध जुळलेले अनुभवायला मिळतात. मग, हा शेतकरी आपल्या घरातील सदस्यांपैकीच एक असणाऱ्या बैलावर अत्याचार कसा करेल?

बैलांवर शेतकरी अत्याचार कसा करेल? निवृत्त न्यायमूर्तींचा सरकारला सवाल

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (सातारा) : शेतकरी पोटच्या गोळ्याहून अधिक माया बैलांवर करतो. त्यांना पौष्टिक खाद्य देतो. शर्यतीच्या बैलांना (Bullock Cart Race) वर्षभर अन्य काम देखील दिले जात नाही. अनेकदा बळिराजा आणि बैलाचे भावनिक बंध जुळलेले अनुभवायला मिळतात. मग, हा शेतकरी आपल्या घरातील सदस्यांपैकीच एक असणाऱ्या बैलावर अत्याचार कसा करेल? बैल हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असल्याने बैलगाड्यांच्या शर्यतीत बैलांवर अत्याचार केला जातो, हे म्हणणे चुकीचे ठरेल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा गोवा राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी (Ambadas Joshi) यांनी व्यक्त केले.

येथील श्री सेवागिरी मंदिरात गोवा राज्याच्या लोकायुक्तपदी निवड झाल्याबद्दल अंबादास जोशी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त विजय जाधव, माजी उपसरपंच प्रकाश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मानाजी घाडगे, ज्‍येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, जीवन जाधव, बैलगाडी शर्यत असोसिएशनचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. जोशी म्हणाले, ‘‘शर्यतींच्या माध्यमातून फक्त उच्च प्रतीच्या बैलांची निवड होऊन त्यांचा वापर फक्त संकरासाठी केला जातो. या बैलांपासून पैदास होणाऱ्या खिल्लार बैलांचा शेतीच्या कामासाठी तर गाईंचा विविध उत्पादनांसाठी वापर केला जातो. त्यामुळे, या जातिवंत खिल्लार बैलांना बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बऱ्यापैकी या खिल्लार जनावरांवर अवलंबून असते. बैलांचे शेतकऱ्यांशी असलेले भावनिक नाते तसेच त्यांचे शेतीच्या कामातील व धार्मिक महत्त्व लक्षात घेता बैलगाडी शर्यत पुन्हा एकदा सुरू होण्याची गरज आहे.’’

हेही वाचा: Banner War : साताऱ्यात श्रेयवादावरून दोन राजे आमने-सामने

माजी उपसरपंच प्रकाश जाधव म्हणाले, ‘‘ श्री. जोशी यांच्या माध्यमातून गेली दोन वर्षे बैलगाडी शर्यत सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या सदस्यांना खिल्लार जातीच्या बैलांचे शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्व पटवून दिल्यामुळे ते देखील अनुकूल झाले आहेत. शासनानेसुद्धा शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेता नियम व अटी घालून बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्याची गरज आहे.’’ विजय जाधव यांनी प्रस्ताविक केले. जीवन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मानाजी घाडगे यांनी आभार मानले.

loading image
go to top