
तारळे : कपडे धुवायला तारळी नदीवर गेलेल्या महिलेचा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढून नदीपात्रात वाहण्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी आंबळे (ता. पाटण) येथे घडली. साधना रमेश सावंत (वय ४३, रा. आंबळे, ता. पाटण) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.